Published - Thu, 17-Nov-2022
LinkedIn हे B2B सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे जे मुख्यतः कॉर्पोरेट जगासाठी बनवले गेलेले आहे. LinkedIn चे मुख्य प्रेक्षक हे सेवा क्षेत्रात काम करणारे लोक आहेत. तसेच, LinkedIn जगभरातील विविध कर्मचारी त्यांच्या कामातील यश साजरे करत असल्याचे किंवा त्यासंबंधित व्यावसायिक प्रमाणपत्रे शेअर करण्यासारख्या गोष्टीदेखील अनुभवते. तर, LinkedIn नेमके कोणासाठी आहे आणि त्यावर कोणी जाहिरात करावी?
लिंक्डइनवरील प्रेक्षक
LinkedIn वर कोणी जाहिरात करावी हे समजून घेण्यासाठी, आपल्याला या प्लॅटफॉर्मवरचे प्रेक्षक समजून घेणे आवश्यक आहे. LinkedIn ही एक अशी कल्पना आहे जीने विविध व्यावसायिकांसाठी एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर—एक जागा अशी निर्माण करून दिलेले आहे, जी एक अद्वितीय व्यावसायिक-सामाजिक वातावरण ऑफर करते. तुम्हाला LinkedIn वर कुत्र्या-मांजरीचे व्हिडीओज किंवा त्यासारखे आनंदी किंवा मजेशीर कन्टेन्ट अगदी क्वचितच दिसतील. LinkedIn चे वातावरण हे "गंभीर" आहे.
आणि त्यावरील वापरकर्ते देखील. LinkedIn वर लोकं हे मौजमजा करायला जात नाहीत.
LinkedIn हे अखंड व्यावसायिकता आणि औपचारिक वृत्तीचे प्रतीक आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
तर तुम्ही तुमचे अचूक लक्ष्य प्रेक्षक हे या गंभीर, व्यावसायिक चेहऱ्यांपासून वेगळे कसे करू शकता? यात कठीण असे काहीच नाही, तुम्ही त्यांचे देश, लिंग, व्यवसाय, कंपन्या इत्यादी माहितीद्वारे वर्गीकरण करू शकता. लिंक्डइनमध्ये जाहिरातदारांसाठी त्यांच्या कंटेंटची लिंक्डइनवर कोणत्याही त्रासाशिवाय जाहिरात करण्यासाठी एक व्यवस्थितपणे डिझाईन केलेला जाहिरात प्लॅटफॉर्म आहे.
तर, जाहिरातीसाठी लिंक्डइन कोणी वापरावे?
जसे की आम्ही पूर्वी सांगितले आहे, LinkedIn हे व्यावसायिकांसाठी बनवलेले B2B (व्यवसाय ते व्यवसाय) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. तर मग उदाहरणार्थ, नोकरी शोधण्यात किंवा प्लॅटफॉर्मवर एखादे व्यावसायिक कनेक्शन शोधण्यात स्वारस्य असलेल्या समूहासाठी तुम्ही साबण उत्पादनाची जाहिरात कराल का? नक्कीच नाही. ते फुरसतीच्या कारणासाठी तिथे नसतात. ते व्यावसायिक एका मिशनवर आहेत.
त्यामुळे, जर तुम्ही साबण उत्पादनाचे जाहिरातदार असाल, तर हे व्यासपीठ तुमच्यासाठी नक्कीच नाही... किंवा जोपर्यंत तुम्ही साबणाचा क्रांतिकारक शोध लावत नाही तोपर्यंत नाही. काहीही नवीन, जगावेगळे असेल तर तुम्ही लोकांचे लक्ष नक्कीच वेधून घेता, मग भले प्लॅटफॉर्म कोणताही असो. मी गंमत करत नाही आहे—लोकांना चांगली सामग्री पाहणे खरोखर आवडते, आणि ही वस्तुस्थिती आहे.
असो. तुम्ही LinkedIn वर जाहिरात करू शकता की नाही हे समजून घेण्यासाठी, खालील गोष्टींचा विचार करा.
अ] तुम्ही B2B व्यवसाय चालवता.
B2B व्यवसाय काय आहे? आपली उत्पादने आणि/किंवा सेवा दुसऱ्या व्यवसायांना प्रदान करणारा व्यवसाय हा B2B व्यवसाय आहे. जर तुमचा व्यवसाय अशा स्वरूपाचा असेल, तर LinkedIn तुमच्यासाठी आदर्श ठरू शकेल. लिंक्डइन ऍड प्लॅटफॉर्मद्वारे तुम्ही इतर कंपन्यांना किंवा LinkedIn वरील यूजर्सना लक्ष्य करून तुमच्या सेवा किंवा उत्पादनांची जाहिरात करू शकता. काही परिस्थितींमध्ये, लिंक्डइनचा वापर B2C पद्धतीने (ग्राहकांसाठी व्यवसाय) देखील केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, व्यावसायिक कोर्सेसची विक्री.
ब] तुम्हाला जाहिरातींसाठी लवचिक मार्ग शोधात आहात.
येथे लवचिक असण्याचा अर्थ नवीन जाहिरात प्लॅटफॉर्म किंवा वेगळी रणनीती वापरून पाहणे असा असला तरी तुमचा व्यवसाय जे आम्ही 'अ' मुद्द्यात जे म्हटले आहे त्याच्याशी संलग्न असल्याची खात्री करून घ्या. याचा अर्थ अजूनही लिंक्डइनवर साबण उत्पादनाची जाहिरात करणे असा होत नाही. परंतु, तुमचा व्यवसाय हा इतर व्यावसायिक किंवा कॉर्पोरेट कंपन्यांसाठी काहीतरी करू शकेल असा विश्वास असलेला असल्यास, LinkedIn तुमच्यासाठी नवीन दरवाजे उघडू शकते.
क] तुमचे स्पर्धक प्रामुख्याने LinkedIn वर आहेत.
आणि जर ते खरे असेल, तर तुम्ही लिंक्डइनकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तुमचे प्रतिस्पर्धी काय करत आहेत आणि ते कशाकडे दुर्लक्ष करत आहेत याचे तुम्ही नेहमी संशोधन करू शकता. अशी माहिती ही तुम्ही तुमच्या फायद्यासाठी वापरू शकता आणि तुमचा व्यवसाय आणखी वाढवण्यासाठी LinkedIn वर विशिष्ट लक्ष्यित प्रेक्षक तयार करू शकता.
ड] लिंक्डइनमध्ये लीड जेन फॉर्मस् आहेत.
याचा अर्थ काय? तुम्ही अनुभवी सोशल मीडिया जाहिरातदार असल्यास, तुमच्या जाहिरातींवर क्लिक करणार्या वापरकर्त्यांकडून वास्तविक डेटा गोळा करणे किती कठीण आहे हे तुम्हाला माहीती असेलच. एखाद्या जाहिरातीमध्ये फॉर्म असल्यास अनेकजण कोणत्याही कारणास्तव त्याकडे दुर्लक्ष करतात याचा तुम्हाला अनुभव असेलच.
लिंक्डइन देखील तसाच एक फॉर्म सादर करतो. परंतु त्याचे वैशिष्ट्य म्हणजे वापरकर्त्यांना ते स्वतः भरण्यास भाग पाडण्याऐवजी, LinkedIn त्यांच्या प्रोफाईलमधून डेटा संकलित करते आणि त्यातील बहुतांश जागा स्वयं भरते. हे जलद आणि सोयीस्कर आहे, खरं की नाही? तसेच, वापरकर्ते अजूनही त्यांची माहिती 'सबमिट' करायचे की नाही यावर नियंत्रण ठेवतात, त्यामुळे शेवटी, त्यांची गोपनीय माहिती ही सुरक्षित राहते. यामुळे तुमचा रूपांतरण दर (Conversion Rate) आणि ROI वाढविण्यात मदत करू शकते.
निष्कर्ष - जाहिरातीसाठी लिंक्डइन कोणी वापरावे?
लिंक्डइन हे व्यावसायिक वातावरण असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही नवीन जाहिरात माध्यम शोधत असाल किंवा एक B2B व्यवसाय असाल तर, LinkedIn हा तुमच्या व्यवसायासाठी संभाव्य पर्याय असू शकतो. लिंक्डइनवर जाहिरात चालवणे अजिबात अवघड नाही कारण ही प्रक्रिया अतिशय स्व-स्पष्टीकरणात्मक आणि सोपी आहे—जोपर्यंत तुमच्याकडे आवश्यक असलेले बजेट आहे.
तुम्हाला LinkedIn सोबत कोणत्याही व्यावसायिक मदतीची आवश्यकता असल्यास, कृपया आमच्याशी कधीही कनेक्ट होण्यास अजिबात संकोच करू नका!
Mon, 06-Feb-2023
Fri, 03-Feb-2023
Fri, 03-Feb-2023
Write a public review