स्किल स्पेसने इंग्रजी शिकण्यात आणि बोलण्यात आत्मविश्वास मिळवू इच्छिणाऱ्या लोकांसाठी हा मूलभूत इंग्रजी अभ्यासक्रम (बेसिक स्पोकन इंग्लिश कोर्स) विकसित केला आहे. या कोर्सचा उद्देश तुम्हाला इंग्रजी भाषा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी साहाय्य करेल आणि तुम्हाला अधिक प्रगत इंग्रजी शिकण्यास पुढे मदत करेल.
या कोर्समध्ये, तुम्ही वर्णमाला, संख्या मोजणी, मूलभूत इंग्रजी घटक आणि व्याकरण काळ शिकू शकाल. या संयोजनाने, तुम्ही एकसंध वाक्ये बनवू शकाल, दैनंदिन जीवनातील परिस्थिती समजावून सांगू शकाल, संख्या मोजू शकाल, तारखा ओळखू शकाल आणि आणि वस्तूंचे वर्णन करण्यासाठी भाषा प्रभावीपणे वापरू आत्मविश्वासाने वापरू शकाल.
आम्ही हा अभ्यासक्रम हिंदी आणि मराठी भाषांमध्येही उपलब्ध करून दिला आहे. एक विध्यार्थी म्हणून हा आमचा उपक्रम तुमच्यासाठी संकल्पना समजून घेणे सोपे करेल.
या कोर्समध्ये, आम्ही कव्हर करतो:
- अक्षरे आणि शब्दसंग्रह
- संख्या आणि मोजणी (तारखांसह)
- नाम, सर्वनाम, क्रियाविशेषण, विशेषण, क्रियापद
- इंग्रजी व्याकरण काळ
- वाक्यांचे प्रकार
आता आपल्या परिचित भारतीय भाषांमध्ये शिका—हा कोर्स इंग्रजी, मराठी, आणि हिंदीत उपलब्ध आहे. या, या इंग्रजी शिकण्याच्या अद्भुत जगात प्रवेश करा आणि मूलभूत गोष्टी समजून घेऊन स्वतःला जागतिक स्तरावर सक्षम करण्याच्या दिशेने एक पाऊल टाका.
तसेच, कोणत्याही वेळी, तुम्हाला काही शंका असल्यास, कृपया मेसेज टॅबद्वारे आमच्याशी संपर्क साधा किंवा तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी दर महिन्याला आमच्या लाईव्ह सत्रांपैकी एकाला उपस्थित राहा.
Write a public review