प्रकाशित केले आहे - Mon, 06-Feb-2023

ऑक्सफोर्ड कोमा क्या है? . एक संक्षिप्त!

ऑक्सफोर्ड कोमा क्या है? . एक संक्षिप्त!

ऑक्सफोर्ड कोमा (Oxford Comma) पूरे आधुनिक अंग्रेजी इतिहास में एक गर्मागर्म बहस का विषय रहा है, हालांकि अभी भी इस बात पर कोई सहमति नहीं है कि यह कॉमा सही है या नहीं। इस लेख में, हम आपको यह नहीं बताने जा रहे हैं कि इस अल्पविराम का उपयोग करना उचित है या नहीं (इसमें बहुत अधिक गहराई लगेगी)। इसके बजाय, हम केवल यह देखेंगे कि ऑक्सफोर्ड अल्पविराम क्या है।

तो, ऑक्सफोर्ड अल्पविराम वास्तव में क्या है?

एक ऑक्सफोर्ड कॉमा, या सीरियल कॉमा, तीन या अधिक की सूची में दूसरे आइटम के बाद "और" (And) या "या" (Or) शब्द से पहले इस्तेमाल किया जाने वाला कॉमा है। यह अल्पविराम पहली बार ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी प्रेस द्वारा इस्तेमाल किया गया था, इसलिए यह नाम है।

ऑक्सफोर्ड अल्पविराम का उपयोग करना यह उनकी अपनी पसंद है। साथ ही, यह क्षेत्र पर निर्भर करता है। उदाहरण के लिए, अमेरिकी अंग्रेजी लगभग हमेशा इसका उपयोग करने की सलाह देती है। हालाँकि, कनाडा या यूके से अंग्रेजी लेखन शैली विपरीत सुझाव देती है।

मेरी व्यक्तिगत राय में, ऑक्सफोर्ड अल्पविराम का प्रयोग उन वाक्यों में किया जाना चाहिए जो उस वाक्य में हुई अस्पष्टता को समाप्त कर दें।

आइए देखें कि कुछ दिलचस्प उदाहरणों के साथ देखते है की ऑक्सफ़ोर्ड अल्पविराम का उपयोग कहाँ करें।

ऑक्सफोर्ड कोमा और अस्पष्टता

अस्पष्टता क्या है? अस्पष्टता इंगित करती है कि एक शब्द या वाक्यांश के एक से अधिक अर्थ हो सकते हैं। चूंकि ऑक्सफोर्ड अल्पविराम तीन या अधिक की श्रृंखला में सूचीबद्ध वस्तुओं से जुड़ी अस्पष्टता से संबंधित है, आइए ऐसे दो उदाहरण लें।

1. The office hires software engineers, artists, and salesmen.

यहाँ, "artists" और "and salesmen" के बीच अल्पविराम ऑक्सफोर्ड अल्पविराम है। हालाँकि, अगर मैं इसे इस वाक्य से हटा दूं, तो अर्थ बिल्कुल नहीं बदलता है। यह देखो।

The office hires software engineers, artists and salesmen.

चूंकि सॉफ्टवेयर इंजीनियर और कलाकार दो पूरी तरह से अलग शब्द हैं, इसमें कोई अस्पष्टता नहीं है। तो, इस मामले में, हम सुरक्षित रूप से कह सकते हैं कि ऑक्सफोर्ड अल्पविराम अनावश्यक है।

एक और उदाहरण लेते हैं!

2. He gave his speech to the audience, cats, and dogs.

क्या आप यहां ऑक्सफोर्ड कॉमा खोज सकते हैं? गुड़! अब, क्या होगा अगर मैं उस अल्पविराम को हटा दूं? वह वाक्य होगा:

He gave his speech to the audience, cats and dogs.

यहाँ ऑक्सफोर्ड अल्पविराम को हटाने से हमारे वक्ता अपने भाषण से केवल बिल्लियों और कुत्तों को संबोधित कर रहे है ऐसा एक मज़ेदार दिखावा  यहाँ बनता है। यहाँ अल्पविराम जोड़ने से दर्शक (Audience) यह एक अलग घटक के रूप में अलग कर दिया जाएगा। जिससे यह स्पष्ट होता है कि दर्शकों में केवल बिल्लियाँ और कुत्ते ही नहीं, बल्कि अन्य लोग भी शामिल हैं।

बेशक, वैसे भी वह वाक्य अपने आप में उतना स्पष्ट नहीं है, क्योंकि यहाँ आपको कोई सुराग नहीं मिलता है कि वास्तव में "दर्शक" कौन है। लेकिन, कम से कम यह सिर्फ बिल्लियाँ और कुत्ते नहीं हैं। देखें कि अर्थ कैसे बदलता है?

आइए कुछ और उदाहरण देखें जहां एक श्रृंखला में तीन या अधिक तत्वों को स्पष्ट रूप से अलग करने के लिए ऑक्सफोर्ड अल्पविराम की निश्चित रूप से आवश्यकता होती है।

a. Ms Sarita is working on two projects, designing the brochure, and preparing a speech.

b. He went there with his parents, Rahul, and Anuja.

अंतिम विचार

ऑक्सफोर्ड अल्पविराम के उपयोग पर सार्वभौमिक सहमति अभी तक नहीं दी गई है। हालाँकि, वस्तुनिष्ठ रूप से बोलते हुए, यह आप पर निर्भर है कि आप अल्पविरामों का उपयोग कैसे करें, जैसा कि आप फिट देखते हैं। जैसा कि आप ऊपर देख सकते हैं, इस अल्पविराम की कोई आवश्यकता नहीं है, है ना?

तो, हमने ऑक्सफोर्ड कॉमा के बारे में क्या सीखा? जहाँ भी आपको वाक्य में उचित लगे वहा इस अल्पविराम का उचित रूप से प्रयोग जरूर करें । यदि आपको व्यक्तिगत रूप से लगता है कि किसी स्थान पर ऑक्सफोर्ड कॉमा का उपयोग नहीं करने से वाक्य भ्रमित हो जाएगा, तो हर तरह से उस कॉमा का उपयोग तो बेशक करें। हालाँकि, इस बात से ध्यान रखें कि आप  भाषा के कौनसे सम्मेलनों या लेखन शैली का अनुसरण कर रहे हैं। क्योंकि जैसा कि पहले उल्लेख किया गया है, कुछ लेखन शैली ऑक्सफोर्ड कॉमा के उपयोग को सख्ती से प्रतिबंधित करती हैं।

हालाँकि, लेखन एक व्यक्तिगत गतिविधि है और लेखन शैली का अपना व्यक्तित्व है। तो, आपको अल्पविराम का उपयोग करना चाहिए या नहीं? मैं इसे आपके सर्वोत्तम निर्णय पर छोड़ता हूँ।

यदि आप अपने कौशल को बढ़ाने के लिए कुछ उपयोगी पाठ्यक्रमों की तलाश कर रहे हैं, तो बेझिझक हमारी वेबसाइट ब्राउज़ करें या अधिक जानकारी के लिए हमें संदेश भेजें!

शोध (search)
लोकप्रिय विभाग
आमचे ब्लॉग्स
ऑक्सफोर्ड स्वल्पविराम म्हणजे काय? । एक थोडक्यात!
ऑक्सफोर्ड स्वल्पविराम म्हणजे काय? । एक थोडक्यात!
ऑक्सफर्ड स्वल्पविरामाने (Oxford Comma) संपूर्ण आधुनिक इंग्रजी इतिहासात एक जोरदार चर्चेचा विषय आहे, तरीही स्वल्पविराम योग्य आहे की नाही याविषयी अजूनही कुणाचेच एकमत नाही. या लेखात, हा स्वल्पविराम वापरणे योग्य आहे की नाही हे आम्ही सांगणार नाही (त्यासाठी खूप खोलात जावे लागेल). त्याऐवजी, आम्ही फक्त ऑक्सफर्ड स्वल्पविराम काय आहे ते पाहणार आहोत.तर, ऑक्सफर्ड कॉमा म्हणजे नक्की काय?ऑक्सफर्ड स्वल्पविराम, किंवा अनुक्रमांक स्वल्पविराम, हा स्वल्पविराम आहे जो "आणि" (And) किंवा "किंवा" (Or) या शब्दापूर्वी तीन किंवा अधिकच्या यादीतील दुसऱ्या आयटमनंतर वापरला जातो. हा स्वल्पविराम प्रथम ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने वापरला होता, म्हणून हे नाव.ऑक्सफर्ड स्वल्पविराम वापरणे, ही ज्याची त्याची स्वतःची निवड असते. तसेच, ते प्रदेशावरही अवलंबून असते. उदाहरणार्थ, अमेरिकन इंग्रजी जवळजवळ नेहमीच ते वापरण्याची शिफारस करते. तथापि, कॅनडा किंवा यूके मधील इंग्रजी लेखन शैली या विरुद्ध सल्ला देतात.माझ्या वैयक्तिक मतानुसार, ऑक्सफर्ड स्वल्पविराम अशा वाक्यांमध्ये वापरला जावा ज्यामुळे त्या वाक्यातील संदिग्धता नाहीशी होईल.काही मनोरंजक उदाहरणांसह ऑक्सफर्ड स्वल्पविराम कुठे वापरायचा आहे ते पाहू.ऑक्सफर्ड स्वल्पविराम आणि संदिग्धतासंदिग्धता म्हणजे काय? संदिग्धता असे दर्शवते की एखाद्या शब्दाचा किंवा वाक्याचा एकापेक्षा जास्त अर्थ असू शकतो. ऑक्सफर्ड स्वल्पविराम तीन किंवा अधिकच्या मालिकेत सूचीबद्ध केलेल्या वस्तूंशी संबंधित संदिग्धतेशी संबंधित असल्याने, अशी दोन उदाहरणे घेऊ.1. The office hires software engineers, artists, and salesmen.येथे, "artists" आणि "and salesmen" मधील स्वल्पविराम हा ऑक्सफर्ड स्वल्पविराम आहे. तथापि, मी ते या वाक्यातून काढले तर अर्थ अजिबात बदलत नाही. हे बघा. The office hires software engineers, artists and salesmen. सॉफ्टवेअर अभियंता आणि कलाकार हे दोन पूर्णपणे भिन्न शब्द असल्याने त्यात संदिग्धता निर्माण होत नाही. तर, या प्रकरणात, ऑक्सफर्ड स्वल्पविराम पर्यायी किंवा अनावश्यक आहे, असे आपण खात्रीने म्हणू शकतो. अजून एक उदाहरण घेऊ!2. He gave his speech to the audience, cats, and dogs.तुम्ही येथील ऑक्सफर्ड स्वल्पविराम ओळखू शकता का? छान! आता, मी तो स्वल्पविराम काढला तर? ते वाक्य असे असेल.He gave his speech to the audience, cats and dogs.ऑक्सफर्ड स्वल्पविराम काढून टाकल्याने येथे आपल्या वक्त्याने केवळ मांजरी आणि कुत्र्यांना भाषण दिल्याचे एक मजेदार उदाहरण तयार होते. तेथे स्वल्पविराम जोडल्याने प्रेक्षक एक स्वतःचा घटक म्हणून विभक्त होईल. ज्यामुळे असे स्पष्ट होते कि प्रेक्षकामध्ये काही फक्त मांजरी आणि कुत्रेच नाही तर इतर लोकही आहेत.अर्थात, हे वाक्य तरीही स्वतः तितके स्पष्ट नाही कारण येथे आपणास "प्रेक्षक" नक्की कोण आहेत याचा सुगावा लागत नाही. पण, किमान ते फक्त मांजरी आणि कुत्रे नाही. बघा अर्थ कसा बदलतो?चला आणखी काही उदाहरणे पाहू या जेथे मालिकेतील तीन किंवा अधिक घटक स्पष्टपणे विभक्त करण्यासाठी स्वल्पविराम निश्चितपणे आवश्यक असेल.a. Ms Sarita is working on two projects, designing the brochure, and preparing a speech.b. He went there with his parents, Rahul, and Anuja.अंतिम विचारऑक्सफर्ड स्वल्पविराम वापरावरील सार्वभौम मान्यता ही अजून तरी दिली गेलेली नाहीये. तथापि, वस्तुनिष्ठपणे बोलायचे झाल्यास, स्वल्पविराम योग्य वाटेल तसे व्यक्तिनिष्ठपणे वापरणे आपल्यावर अवलंबून आहे. तुम्ही वर पाहिल्याप्रमाणे, या स्वल्पविरामाची गरज आहेचं असे नाही, खरे आहे ना?तर, ऑक्सफर्ड स्वल्पविरामाबद्दल आपण काय शिकलो? हा स्वल्पविराम एखाद्या वाक्यात तुम्हाला योग्य वाटेल तेथे तो योग्यप्रकारे वापरा. एखाद्या जागी ऑक्सफर्ड स्वल्पविराम ना वापरल्याने वाक्यात गोंधळ होईल असे तुम्हाला वैयक्तिकरित्या वाटत असल्यास, तेथे तो स्वल्पविराम नक्कीच वापरा. तथापि, आपण कोणत्या भाषेचे नियम किंवा लेखन शैली पाळत आहात याची जाणीव ठेवा. कारण आधी सांगितल्याप्रमाणे, काही लेखन शैली मार्गदर्शक ऑक्सफोर्ड स्वल्पविराम वापरण्यास सक्त मनाई करतात.तथापि, लेखन ही एक वैयक्तिक क्रिया आहे आणि लेखन शैलीचे स्वतःचे व्यक्तिमत्व आहे. तर, तुम्ही स्वल्पविराम वापरावा की नाही? मी ते तुमच्या सर्वोत्तम निर्णयावर सोडेन.तुमची कौशल्ये वाढवण्यासाठी तुम्ही काही उपयुक्त अभ्यासक्रम शोधत असाल, तर मोकळ्या मनाने आमची वेबसाइट ब्राउझ करा किंवा अधिक माहितीसाठी आम्हाला संदेश द्या!

Mon, 06-Feb-2023

नवशिक्यांसाठी मूलभूत इंग्रजी व्याकरण
नवशिक्यांसाठी मूलभूत इंग्रजी व्याकरण
जेव्हा तुम्ही भारतात इंग्रजी भाषेबद्दल चर्चा करता तेव्हा तुमच्या मनात पहिली गोष्ट कोणती येते? इंग्रजी व्याकरण ही...! या लेखात, आम्ही नवशिक्यांसाठी काही इंग्रजी व्याकरण कव्हर करत आहोत.इंग्रजी व्याकरण नक्की आहे काय?इंग्रजी भाषेचा अभ्यास करताना आपण भारतीयांना तांत्रिकता आवडते. भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ (Past Tense, Present Tense, Future Tense)... जरी तुम्ही इंग्रजी शिकत नसलात, तरी आम्ही हमी देतो की तुम्ही हे शब्द यापूर्वी अनेकदा ऐकले असतील. ते आपल्यासाठी अपरिचित नक्कीच नाहीत.पण व्याकरण (Grammar) म्हणजे नक्की काय? व्याकरण हा मुळात भाषा प्रभावीपणे जोडण्यासाठी आणि वापरण्यासाठी तयार केलेल्या नियमांचा एक पारंपरिक संच आहे—ज्याने भाषा योग्यप्रकारे अर्थपूर्ण होईल. व्याकरण हे अढळ नसले तरी ते एखादी भाषा अस्खलितपणे समजून घेण्यासाठी आणि बोलण्यासाठी आवश्यक आहे.म्हणून, या लेखात, आम्ही नवशिक्यांसाठी काही मूलभूत इंग्रजी व्याकरण कव्हर करत आहोत, ज्यामध्ये सर्वनाम (Pronouns) आणि साधे काल (Simple Tenses) समजून घेणे समाविष्ट आहे.इंग्रजी सर्वनामआपल्या सर्वांना नाम (Noun) काय आहे याची जाणीव आहे, बरोबर? नाम ही मुळात वस्तू, ठिकाणे, व्यक्ती आणि इतर सजीवांची नावे असतात (उदा. फूल, पाय, जॉन, भोपळा, टेबल, फर्निचर, संगणक). आता समजा, जर आपण वेगवेगळ्या वाक्यांमध्ये तेच तेच नाम परत परत वापरले तर ते किती विचित्र वाटेल? म्हणून, त्या जागी आपण तेथे सर्वनाम वापरतो. आपल्या भाषेत पण आपण हेच करतो, नाही का?सर्वनाम (Pronoun) काय आहेत? सर्वनाम हा एक नामांसाठी पर्याय आहे जे भाषा बोलणे आणि समजणे सुलभ करते. सर्वनामांच्या तीन श्रेणी आहेत आणि प्रत्येक श्रेणी पुढील दोन श्रेणींमध्ये विभागली गेली आहे.1. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम (First Person Pronouns)अ) एकवचनीप्रथम-पुरुषी एकवचनी सर्वनाम हे स्वतःचा संदर्भ देण्यासाठी वापरला जाते. हे सर्वनाम 'I/me' आहे.उदाहरणार्थ, I am an engineer.लक्षात ठेवा, 'I' हे नेहमी मोठ्या अक्षरात लिहिलेले असते.b) अनेकवचनीप्रथम-पुरुषी बहुवचन सर्वनाम आपल्या स्वतःच्या गटाचा संदर्भ देण्यासाठी वापरले जाते. हे सर्वनाम 'we/us' आहे.उदाहरणार्थ, 'We are the future!'2. द्वितीय पुरुषवाचक सर्वनामइंग्रजी भाषेत फक्त एकच द्वितीय-पुरुष सर्वनाम आहे, ते म्हणजे 'You' किंवा 'Your'. हे सर्वनाम तुम्ही ज्या लोकांशी थेट बोलता किंवा लिहिता त्यासंदर्भी वापरले जाते. इंग्रजीत द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाचे कोणतेही एकवचन किंवा अनेकवचन नाही. तथापि, या 'You' सर्वनामापुढे 'all' असा शब्द लावून त्याचा बहुवचनी अर्थ काढता येतो. ही दोन उदाहरणे पहा."You are a man.""You all are sailors."3. तृतीय पुरुषवाचक सर्वनामअ) एकवचनीजेव्हा तृतीय पुरुषवाचक एकवचनी सर्वनामांचा विचार केला जातो तेव्हा आपल्याला लिंग हा घटक देखील विचारात घ्यावा लागतो. इंग्रजीत वेगवेगळ्या लिंगांसाठी वेगवेगळी सर्वनामे आहेत. खालील यादीवर एक नजर टाका.He - तृतीय पुरुषवाचक एकवचनी पुल्लिंगी सर्वनाम.He is a boy.She - तृतीय पुरुषवाचक एकवचनी स्त्रीलिंगी सर्वनाम.She is a girl.It - मानवाव्यतिरिक्त निर्जीव वस्तू आणि इतर सजीवांसाठी वापरले जाणारे तृतीय पुरुषवाचक एकवचनी नपुंसकलिंगी सर्वनाम.It is a box.b) अनेकवचनीइंग्रजीमध्ये फक्त एक तृतीय पुरुषवाचक बहुवचनी सर्वनाम आहे आणि ते आहे 'They'. एकवचनी सर्वनामांसारखे हे सर्वनाम लिंगाने प्रभावित होत नाही. तसेच, इंग्रजीत हे सर्वनाम वडिलधार्‍यांचा आदर दाखवण्यासाठी देखील वापरले जात नाही. भारतीय इंग्रजीत ही चूक अधेमध्ये आढळते. परंतु, इंग्रजीमध्ये मोठ्यांसाथीचा आदर दर्शवण्यासाठी कोणतेही सर्वनाम नाहीत. खालील उदाहरण पहा.They are playing on the ground.इंग्रजी व्याकरणातील काळ (Tenses in English Grammar)इंग्रजी व्याक्रणामध्ये, अर्थातच, काळापेक्षा आणखी काही घटक आहेत. तथापि, व्याकरण कसे कार्य करते यावर काळ सर्वात जास्त परिणाम करतात. म्हणून, मूलभूत स्तरावर इंग्रजी काळ कसे कार्य करतात हे समजून घेणे आवश्यक आहे. चला, त्यांना अधिक तपशीलवार पाहू.बर्‍याच भारतीय भाषांप्रमाणे, इंग्रजीमध्ये देखील तीन मूलभूत काळ आहेत, जे पुढे चार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागलेले आहेत. हे काळ म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्य. आपण भाषा शिकण्याचा विचार करत असल्यास प्रत्येकाला माहित असले पाहिजे असे मूलभूत तीन काळ पाहू.a. साधा वर्तमान काळ (Simple Present Tense)साधा वर्तमान काळ हे एक साधे विधान दर्शवते जे वर्तमानातील घटनेचे वर्णन करते. हा काळ वर्तमानात घडत असलेल्या क्रियेऐवजी, वस्तुस्थितीपर माहिती देण्यासाठी जास्ती वापरला जातो. या काळाची मूलभूत वाक्य रचना खालील सूत्रानुसार आहे:Subject + V1 + Object/Complementउदाहरणार्थ, Aury eats a mango.. इथे 'Aury' ही कर्ता आहे; 'eats' हे क्रियापद आहे; आणि 'mango' हे कर्म आहे.>एक छोटासा धडा!

Fri, 03-Feb-2023

भारतातील वर्डप्रेस होस्टिंग साठीचे पर्याय
भारतातील वर्डप्रेस होस्टिंग साठीचे पर्याय
भारतामध्ये लहान व्यवसायांची एखादी ऑनलाइन ओळख असणे ही तशी अजूनही एक नवीन संकल्पना आहे. अनेकजण या पर्यायाचा विचार करत नसले तरी, त्यांच्यापैकी काहींना ते त्यांच्या व्यवसायासाठी किती महत्त्वाचे आहे हे जाणवू लागले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे भारतात एक स्वतःची वेबसाइट असणे. परंतु अशी वेबसाइट असण्यासाठी, तुम्हाला एका होस्टची गरज असते. तर, तुम्हाला भारतात वर्डप्रेस होस्टिंग सोल्यूशन्स कसे आणि कुठे मिळतील? चला, आपण शोधून काढू या!वर्डप्रेस म्हणजे काय?सर्वप्रथम आपण वर्डप्रेस काय आहे ते जाणून घेऊयात. सामान्य माणसाच्या दृष्टीने, वर्डप्रेस हे मुळात तुमची वेबसाइट बनवण्याचे एक साधन आहे, जे मोफत उपलब्ध आहे! आधीच्या काळात तुम्हाला तुमची वेबसाइट बनवण्यासाठी डेव्हलपरची गरज असायची. आता वर्डप्रेस अंशतः तो पर्याय काढून टाकते.तुमची कोणतीही तांत्रिक पार्श्वभूमी नसली तरीही तुम्ही वर्डप्रेससह एक मूलभूत वेबसाइट काही तासांत तयार करू शकता. हे एक EMS साधन आहे जे तुम्हाला सर्व आवश्यक साधने आणि हजारो विनामूल्य टेम्पलेट्स वेबसाइट तयार करण्यासाठी देते. अप्रतिम आहे, नाही? वर्डप्रेस वेबसाइट तयार करणे खरोखरच सोपे करते.तथापि, तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी एक अनोखी दिसणारी वेबसाइट तयार करायची असल्यास तुम्हाला अजूनही डेव्हलपरची नियुक्ती करावी लागेल.वर्डप्रेस होस्ट म्हणजे काय?जरी तुम्ही वर्डप्रेससह विनामूल्य वेबसाइट तयार करू शकत असला तरीही होस्टिंग हे पूर्णपणे भिन्न डोमेन आहे. 'होस्ट' हा मुळात एक सर्व्हर असतो जो तुमची वेबसाइट इंटरनेटवर लाइव्ह ठेवतो आणि ती लोकांसाठी उपलब्ध करून देतो. तुमच्या वेबसाइटसाठी एक विशिष्ट वेबसाइट पत्ता (डोमेन नाव) मिळविण्यासाठी, तुम्हाला एका होस्ट सर्विसची आवश्यकता असते.तांत्रिकदृष्ट्या, तुम्हाला होस्टची गरज आहे का? नाही. तुम्ही वर्डप्रेसवर फक्त वेबसाइट तयार करू शकता आणि ती ".wordpress.com" डोमेनसह प्रकाशित करू शकता. तथापि, यामुळे तुमच्‍या व्‍यवसायाला ती अद्वितीय ओळख मिळत नाही. शिवाय, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी किंवा तुमच्या वेबसाइटवर हेवी-ड्युटी रहदारी हाताळण्यासाठी ते इष्टतम नाही.तर, जरी होस्टिंगसाठी खर्च येत असला तरी त्याच्या काही अतिशय फायदेशीर बाजूदेखील आहेत. सर्वप्रथम, तुम्ही एक विशिष्ट डोमेन नाव निवडू शकता जे तुमच्या व्यवसायासाठी एक अद्वितीय ओळख निर्माण करेल. दुसरे म्हणजे, होस्टिंगसाठी खर्च जरी येत असेल तरी तो परवडणारच नाही असे नाही. तुमचा विश्वास बसणार नाही कदाचित, पण तुम्ही तुमच्या मासिक मोबाइल डेटा पॅकसाठी जेवढे पैसे देता त्यापेक्षाही कमी पैशात तुमच्या वेबसाइटसाठी दर्जेदार होस्ट मिळवू शकता; ज्यामुळे तुमची वेबसाइट हेवी-ड्यूटी ट्रॅफिक भार हाताळू शकते आणि आपली वेबसाइट नेहमीच चालू राहील याची खात्री करते.तसेच, तुमच्या होस्टिंग पॅकेजच्या अनुसार, तुम्हाला तुमच्या होस्ट प्रदात्याकडून वेबसाइट मेंटेनन्स सेवा देखील मिळू शकते.भारतात होस्टिंग सेवेची किंमत कशावरून ठरवली जाते?जेव्हा किंमतींचा विचार केला जातो तेव्हा बरेच निर्धारक असतात. जरी तुम्हाला ५०-१५० रुपये किमतीचे होस्टिंग पर्याय सापडले तरी ते तुमच्यासाठी योग्य असतीलच असे नाही.वर्डप्रेस होस्टिंगचे दोन प्रकार आहेत. तुमची वेबसाइट होस्ट करण्यासाठी शेअर्ड होस्टिंग सर्व्हर हा पहिला पर्याय. याचा अर्थ तुमची वेबसाइट एका अशा सर्व्हरवर होस्ट केली जाईल ज्यावर इतर वेबसाइट देखील होस्ट केल्या गेलेल्या आहेत. उदाहरणार्थ, असा विचार करा की इतर तुम्ही एक अपार्टमेंट भाड्याने घेतलेले आहे पण त्यात इतर भाडेकरू देखील राहतात. दुसरा पर्याय हा डेडिकेटेड होस्टिंग आहे, जिथे तुम्हाला सर्व्हर आणि त्याची संसाधने फक्त तुमच्या वेबसाइटसाठी राखीव ठेवली जातात. अर्थात, सामायिक होस्टिंगपेक्षा हा तुलनेने अधिक महागडा पर्याय आहे.दुसरे म्हणजे, ऑपरेटिंग सिस्टम. होस्ट त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टम म्हणून विंडोज किंवा लिनक्स वापरतात. विंडोजहे सशुल्क सॉफ्टवेअर असल्याने, विंडोज OS सर्व्हरवर होस्टिंग करणे थोडे अधिक महाग होते. तथापि, या क्षेत्रातील अनेक तज्ञ असे सांगतात की लिनक्स वापरणे आपल्या वेबसाइटसाठी विंडोज पेक्षा अधिक व्यवहार्य असू शकते कारण ती मुक्त-स्रोत, विनामूल्य आणि लवचिक आहे.आणि तिसरे, हार्डवेअर. स्वस्त होस्टिंग पर्यायांमुळे तुम्हाला तुमच्या वेबसाइटसाठी कमी स्टोरेज स्पेस मिळू शकते आणि वेबसाइटचा परफॉर्मन्स देखील थोडा कमी आढळून येऊ शकतो—जर तुम्हाला तुमची वेबसाइट जागतिक स्तरावर प्रकाशित करायची असल्यास हा पर्याय नक्कीच योग्य असू शकत नाही. अधिक महाग पॅकेजेस तुमच्या वेबसाइटसाठी अधिक स्टोरेज स्पेस आणि हार्डवेअर संसाधने देतात.म्हणून, आपण होस्टिंग पॅकेजचा विचार करण्यापूर्वी हे घटक लक्षात ठेवणे महत्वाचे आहे.भारतातील सर्वोत्तम वर्डप्रेस होस्टिंग सोल्यूशन्स कोणते आहेत?भारतातील वर्डप्रेस होस्टिंग सोल्यूशन्सची किंमत दरमहा ₹59 इतकी कमी असू शकते. परंतु, आपल्या वेबसाइटसाठी दर्जेदार होस्ट मिळणे देखील आवश्यक आहे, नाही का?1. होस्टिंगरHostinger हे लिथुआनियन-आधारित वर्डप्रेस होस्टिंग सोल्युशन आहे जे भारतात लोकप्रिय आहे. त्यांच्याकडे भारतातील सर्व प्रकारच्या वेबसाइट होस्टिंग सोल्यूशन्ससाठी पासून सर्वोत्कृष्ट पॅकेजेस आहेत जे दरमहा  ₹69 पासून सुरु होतात. Hostinger सह तुम्हाला किमान 50GB SSD स्टोरेज स्पेस, 1 वर्षासाठी मोफत डोमेन नाव, 100GB बँडविड्थ, 2 डेटाबेस आणि 1 ईमेल खाते—सर्व काही एका वेबसाइटसाठी मिळते.अधिक तपशीलांसाठी, कृपया वरील लिंकवर क्लिक करा.2. बिगरॉकBigRock ही एक भारतीय होस्टिंग कंपनी आहे जी भारतीय वेबसाइट्सना जागतिक दर्जाची होस्टिंग सोल्यूशन्स प्रदान करते. ₹५९/महिना इतक्या स्वस्त प्लॅनसह, BigRock स्वस्त होस्टिंग सोल्यूशन ऑफर करते. यामध्ये डेडिकेटेड आणि शेअर्ड होस्टिंग पर्याय उपलब्ध आहेत जे Windows किंवा Linux OS आणि उत्कृष्ट हार्डवेअर संसाधनांद्वारे समर्थित आहेत ज्यामुळे तुमची वेबसाइट सुरळीत चालू राहते. त्यांच्या होस्टिंग योजनांबद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी त्यांची वेबसाइट पहा.3. ब्लूहोस्टBlueHost हा जगभरातील आणखी एक प्रसिद्ध होस्टिंग सोल्यूशन्स ब्रँड आहे जो भारतातही प्रसिद्ध आहे. त्यांचे डेटा सेंटर्स भारतातच असल्यामुळे, BlueHost हा एक भारतीय वेबसाइट्ससाठी सर्वोत्तम होस्टिंग सोल्युशन पर्याय आहे. ₹169/महिना पासून सुरू होणार्‍या त्यांच्या शेअर्ड होस्टिंग पर्यायांसह, BlueHost त्यांच्या वेबसाइटसाठी उच्च-गुणवत्तेची हार्डवेअर संसाधने आणि तांत्रिक समर्थन प्रदान करते, अगदी स्वस्त योजनेमध्येदेखील!अधिक तपशीलांसाठी, कृपया त्यांच्या वेबसाइटला भेट द्या.निष्कर्षभारतात वर्डप्रेस होस्ट्सची प्रचंड संख्या आहे. या लेखात, आम्ही भारतातील वर्डप्रेस होस्टिंग सोल्यूशन्ससाठी शीर्ष तीन पर्याय निवडले आहेत. हे आमचे वैयक्तिक मत आहे आणि ही माहिती वर नमूद केलेल्या कोणत्याही कंपन्यांच्या संलग्नतेने किंवा प्रयोजकतेद्वारे प्रभावित झालेली नाही. आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटेल.या लेखावर तुमच्याकडे इतर काही सूचना असल्यास, आमच्याशी मोकळ्या मनाने कनेक्ट व्हा.

Fri, 03-Feb-2023

सर्व ब्लॉग्ज