Published - Fri, 03-Feb-2023
जेव्हा तुम्ही भारतात इंग्रजी भाषेबद्दल चर्चा करता तेव्हा तुमच्या मनात पहिली गोष्ट कोणती येते? इंग्रजी व्याकरण ही...! या लेखात, आम्ही नवशिक्यांसाठी काही इंग्रजी व्याकरण कव्हर करत आहोत.
इंग्रजी व्याकरण नक्की आहे काय?
इंग्रजी भाषेचा अभ्यास करताना आपण भारतीयांना तांत्रिकता आवडते. भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ (Past Tense, Present Tense, Future Tense)... जरी तुम्ही इंग्रजी शिकत नसलात, तरी आम्ही हमी देतो की तुम्ही हे शब्द यापूर्वी अनेकदा ऐकले असतील. ते आपल्यासाठी अपरिचित नक्कीच नाहीत.
पण व्याकरण (Grammar) म्हणजे नक्की काय? व्याकरण हा मुळात भाषा प्रभावीपणे जोडण्यासाठी आणि वापरण्यासाठी तयार केलेल्या नियमांचा एक पारंपरिक संच आहे—ज्याने भाषा योग्यप्रकारे अर्थपूर्ण होईल. व्याकरण हे अढळ नसले तरी ते एखादी भाषा अस्खलितपणे समजून घेण्यासाठी आणि बोलण्यासाठी आवश्यक आहे.
म्हणून, या लेखात, आम्ही नवशिक्यांसाठी काही मूलभूत इंग्रजी व्याकरण कव्हर करत आहोत, ज्यामध्ये सर्वनाम (Pronouns) आणि साधे काल (Simple Tenses) समजून घेणे समाविष्ट आहे.
इंग्रजी सर्वनाम
आपल्या सर्वांना नाम (Noun) काय आहे याची जाणीव आहे, बरोबर? नाम ही मुळात वस्तू, ठिकाणे, व्यक्ती आणि इतर सजीवांची नावे असतात (उदा. फूल, पाय, जॉन, भोपळा, टेबल, फर्निचर, संगणक). आता समजा, जर आपण वेगवेगळ्या वाक्यांमध्ये तेच तेच नाम परत परत वापरले तर ते किती विचित्र वाटेल? म्हणून, त्या जागी आपण तेथे सर्वनाम वापरतो. आपल्या भाषेत पण आपण हेच करतो, नाही का?
सर्वनाम (Pronoun) काय आहेत? सर्वनाम हा एक नामांसाठी पर्याय आहे जे भाषा बोलणे आणि समजणे सुलभ करते. सर्वनामांच्या तीन श्रेणी आहेत आणि प्रत्येक श्रेणी पुढील दोन श्रेणींमध्ये विभागली गेली आहे.
1. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम (First Person Pronouns)
अ) एकवचनी
प्रथम-पुरुषी एकवचनी सर्वनाम हे स्वतःचा संदर्भ देण्यासाठी वापरला जाते. हे सर्वनाम 'I/me' आहे.
उदाहरणार्थ, I am an engineer.
लक्षात ठेवा, 'I' हे नेहमी मोठ्या अक्षरात लिहिलेले असते.
b) अनेकवचनी
प्रथम-पुरुषी बहुवचन सर्वनाम आपल्या स्वतःच्या गटाचा संदर्भ देण्यासाठी वापरले जाते. हे सर्वनाम 'we/us' आहे.
उदाहरणार्थ, 'We are the future!'
2. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम
इंग्रजी भाषेत फक्त एकच द्वितीय-पुरुष सर्वनाम आहे, ते म्हणजे 'You' किंवा 'Your'. हे सर्वनाम तुम्ही ज्या लोकांशी थेट बोलता किंवा लिहिता त्यासंदर्भी वापरले जाते. इंग्रजीत द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाचे कोणतेही एकवचन किंवा अनेकवचन नाही. तथापि, या 'You' सर्वनामापुढे 'all' असा शब्द लावून त्याचा बहुवचनी अर्थ काढता येतो. ही दोन उदाहरणे पहा.
"You are a man."
"You all are sailors."
3. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम
अ) एकवचनी
जेव्हा तृतीय पुरुषवाचक एकवचनी सर्वनामांचा विचार केला जातो तेव्हा आपल्याला लिंग हा घटक देखील विचारात घ्यावा लागतो. इंग्रजीत वेगवेगळ्या लिंगांसाठी वेगवेगळी सर्वनामे आहेत. खालील यादीवर एक नजर टाका.
He - तृतीय पुरुषवाचक एकवचनी पुल्लिंगी सर्वनाम.
He is a boy.
She - तृतीय पुरुषवाचक एकवचनी स्त्रीलिंगी सर्वनाम.
She is a girl.
It - मानवाव्यतिरिक्त निर्जीव वस्तू आणि इतर सजीवांसाठी वापरले जाणारे तृतीय पुरुषवाचक एकवचनी नपुंसकलिंगी सर्वनाम.
It is a box.
b) अनेकवचनी
इंग्रजीमध्ये फक्त एक तृतीय पुरुषवाचक बहुवचनी सर्वनाम आहे आणि ते आहे 'They'. एकवचनी सर्वनामांसारखे हे सर्वनाम लिंगाने प्रभावित होत नाही. तसेच, इंग्रजीत हे सर्वनाम वडिलधार्यांचा आदर दाखवण्यासाठी देखील वापरले जात नाही. भारतीय इंग्रजीत ही चूक अधेमध्ये आढळते. परंतु, इंग्रजीमध्ये मोठ्यांसाथीचा आदर दर्शवण्यासाठी कोणतेही सर्वनाम नाहीत. खालील उदाहरण पहा.
They are playing on the ground.
इंग्रजी व्याकरणातील काळ (Tenses in English Grammar)
इंग्रजी व्याक्रणामध्ये, अर्थातच, काळापेक्षा आणखी काही घटक आहेत. तथापि, व्याकरण कसे कार्य करते यावर काळ सर्वात जास्त परिणाम करतात. म्हणून, मूलभूत स्तरावर इंग्रजी काळ कसे कार्य करतात हे समजून घेणे आवश्यक आहे. चला, त्यांना अधिक तपशीलवार पाहू.
बर्याच भारतीय भाषांप्रमाणे, इंग्रजीमध्ये देखील तीन मूलभूत काळ आहेत, जे पुढे चार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागलेले आहेत. हे काळ म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्य. आपण भाषा शिकण्याचा विचार करत असल्यास प्रत्येकाला माहित असले पाहिजे असे मूलभूत तीन काळ पाहू.
a. साधा वर्तमान काळ (Simple Present Tense)
साधा वर्तमान काळ हे एक साधे विधान दर्शवते जे वर्तमानातील घटनेचे वर्णन करते. हा काळ वर्तमानात घडत असलेल्या क्रियेऐवजी, वस्तुस्थितीपर माहिती देण्यासाठी जास्ती वापरला जातो. या काळाची मूलभूत वाक्य रचना खालील सूत्रानुसार आहे:
Subject + V1 + Object/Complement
उदाहरणार्थ, Aury eats a mango.. इथे 'Aury' ही कर्ता आहे; 'eats' हे क्रियापद आहे; आणि 'mango' हे कर्म आहे.
>एक छोटासा धडा!<
S म्हणजे Subject. वाक्यामधील Subject हा कर्ता असतो (जो क्रिया करतो) आणि इंग्रजीत तो क्रियापदाच्या आधी येतो (अपवाद जर ती एक passive वाक्यरचना (कर्मणि प्रयोग) असेल तरच - जिथे विषय शेवटी येतो किंवा अजिबात येत नाही).
V म्हणजे Verb . क्रियापद (Verb) ही मुळात एक क्रिया आहे जी आपला कर्ता (Subject) करतो. वरील सूत्रात, V1 हे क्रियापदाचे वर्तमान रूप आहे.
Object या वाक्याचा भागावर क्रिया घडते. तथापि, सर्व वाक्यांमध्ये कर्म (Object) नसते. कधीकधी, असे शब्द हे विषयाबद्दल (Subject) अधिक माहिती देऊन वाक्यास पूर्णता आणतात. या प्रकारास, पूरक (Complement) किंवा अधिक तंतोतंत, विषय पूरक (Subject Complement) असे म्हणतात.
b. साधा भूतकाळ
साधा भूतकाळ हा भूतकाळात घडलेल्या घटनेबद्दल वक्तव्य करतो. साध्या वर्तमानकाळाप्रमाणे, साधा भूतकाळ देखील साधारणतः भूतकाळात घडलेल्या घटनेऐवजी वस्तुतः माहिती देण्यासाठी वापरला जातो. त्याची वाक्यरचना खालीलप्रमाणे.
Subject + V2 + Object/Complement
येथे, V2 म्हणजे क्रियापदाचे भूतकाळ स्वरूप.
उदाहरणार्थ, He was a sailor.
तुम्ही या वाक्यातील विषय, क्रियापद आणि पूरक ओळखू शकता का? (येथे कोणतेही कर्म नाही आहे).
c. साधा भविष्यकाळ (Simple Future Tense)
साधा भविष्यकाळ भविष्यात घडणाऱ्या गोष्टी किंवा तथ्यांबद्दल बोलतो. त्यात एवढेच आहे. चला वाक्यरचना पाहू.
Subject + will/shall + V1 + Object/Complement
उदाहरणार्थ, 'they will take the class.' येथे, ' they' हा कर्ता आहे, 'will take' हे क्रियापद वाक्याचा भाग बनवते आणि 'class' हे कर्म आहे.
निष्कर्ष
इंग्रजी व्याकरण समजण्यास सोपे आहे, पण ते अनियमित देखील आहे. या लेखात, आम्ही इंग्रजी व्याकरणाच्या मूलभूत गोष्टींचा फक्त एक थोडक्यात आढावा घेतलेला आहे. तथापि, एक नवशिक्या म्हणून, ते आपल्यासाठी उपयुक्त ठरतील असा आम्हाला विश्वास वाटतो. जेव्हा तुम्ही इंग्रजी शिकायला सुरुवात करता तेव्हा सर्वनाम आणि काळाचे स्वरूप समजून घेणे आवश्यक आहे.
तुम्हाला ही भाषा आणखी शिकण्यात स्वारस्य असल्यास, आम्ही तुम्हाला इंग्रजी व्याकरणाच्या सखोल आकलनासाठी आमचा मूलभूत इंग्रजी अभ्यासक्रम घेण्यासाठी आमंत्रित करू इच्छितो. अधिक माहितीसाठी कृपया आमच्याशी मोकळ्या मनाने कनेक्ट व्हा!
Mon, 06-Feb-2023
Fri, 03-Feb-2023
Fri, 03-Feb-2023
Write a public review