Published - Thu, 17-Nov-2022
इंग्रजी ही आता दीर्घ काळापासून जागतिक भाषा बनलेली आहे. तुम्ही म्हणू शकता की इंग्रजी शिकणे ही आता काळाची गरज बनली आहे. तेदेखील खरेच आहे म्हणा, कारण इंग्रजीमुळे एक नवीन शक्यतांचे जग तुमच्यासाठी उलगडले जाते. तर मग, आपण इंग्रजी शिकावे का? नक्कीच, का नाही? या लेखात, आम्ही काही इंग्रजी शिकण्याच्या टिप्स समाविष्ट करू ज्या नवशिक्यांसाठी उपयुक्त ठरू शकतात.
भारत आणि इंग्रजी
भारत अशा देशांपैकी एक आहे जिथे इंग्रजी सामान्यपणे वापरात दिसते आणि बऱ्यापैकी बोलली जाते. खरं तर, इंग्रजी बोलणाऱ्या लोकसंख्येमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे हे तुम्हाला माहीत आहे का? हो, हे खरे आहे! विकिपीडियानुसार, आपल्याकडे भारतात सुमारे 125 दशलक्ष (12.5 कोटी) इंग्रजी भाषिक आहेत. याशिवाय, इंग्रजी ही भारतातील अधिकृत भाषांपैकी एक आहे.
आपल्या येथे व्यवसायाच्या बैठका इंग्रजीत होतात, शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण इंग्रजीत असते आणि दैनंदिन व्यवहारही इंग्रजीतच चालतात, मग ते लिखित स्वरूपात असो वा तोंडी.
तसेच, तुम्ही तुमच्या शालेय जीवनातदेखील मूलभूत इंग्रजी शिकलेले असाल, खरं की नाही? किंवा तुम्ही शालेय विद्यार्थी असाल तर तुम्ही बहुधा इंग्रजी शिकत असाल. तथापि, भाषा शिकण्याच्या बाबतीत सर्व शाळा विश्वसनीय किंवा कार्यक्षम नसतात कारण ते मुख्यतः शैक्षणिक दृष्टिकोनातून तुम्हाला शिकवतात. म्हणूनच, जवळजवळ आपण सर्वच इंग्रजी ही खाजगी इंग्रजी क्लासेस म्हणून शिकण्यास भर देतो.
हे क्लासेस खरोखर विश्वसनीय असतात का?
होय किंवा नाही, हे मत पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. प्रत्येक इंग्रजी संस्थेचा दृष्टीकोन वेगळा असतो आणि जरी तो एखाद्यासाठी प्रभावी ठरू शकतो, याचा अर्थ असा नाही की तो तुमच्यासाठीही प्रभावी असेल. तुम्ही याबद्दल विचार करत असताना, स्वतःची शिकण्याची क्षमता समजून घेणे देखील महत्त्वाचे आहे. प्रत्येकजण हा त्यांच्या स्वतःच्या वेगाने शिकतो.
तथापि, याचा अर्थ असा नाही की आपण इंग्रजी अजिबात शिकू शकत नाही. किंबहुना, नवीन भाषा शिकणे (फक्त इंग्रजीच नव्हे) हे काहींसाठी भीतीदायकदेखील असू शकते. तथापि, एकदा का आपण सुरुवात केली कि सर्व आपोआप सोप्पे वाटायला लागते. तर हो, तुम्ही कोणत्याही संस्थेत प्रवेश घ्या, फक्त हे लक्षात असू द्यात की तुमची भाषा शिकण्याची इच्छा आणि आवड महत्त्वाची आहे!
शिकाऊ विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषा शिकण्यासाठी सूचना
आम्ही सुरुवात करण्यापूर्वी, आम्ही फक्त हे स्पष्ट करू इच्छितो की प्रत्येकजण एक भाषा एकसारखीच शिकत नाही. या सूचना इतरांसाठी उपयुक्त ठरू शकत असल्या तरी, त्या तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील याची आम्ही हमी देत नाही. या सूचनांचे पालन करण्याची संपूर्ण जबाबदारी तुमची आणि तुमचीच असेल. ठीक आहे, चला सुरुवात करूया!
कोणतीही भाषा तुम्हाला शिकायची असेल तर त्या भाषेत काठोकाठ डुंबून तिचा आस्वाद घेणे हे आवश्यक आहे. नुसते पुस्तकी ज्ञान घेऊन चालत नाही. याचाच अर्थ जेव्हा जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा त्या भाषेतील माध्यमे किंवा पुस्तके वाचा आणि अभ्यास. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीत नवीन असता, तेव्हा एक सर्वोत्तम सल्ला म्हणजे म्हणजे निरीक्षण करणे आणि त्याचे अनुकरण करणे. माझ्या वैयक्तिक अनुभवावरून, मी असे म्हणू शकतो की हि पद्धत माझ्यासाठी अतिशय उपयुक्त ठरलेली आहे.
अ. मुलांची पुस्तके वाचा
वय कितीही असो, जर तुम्ही नवीन भाषा शिकत असाल तर तुम्ही प्रथमतः नेहमी मुलांची पुस्तके वाचण्यास प्राधान्य द्यावे. का? कारण ते विशेषत: भाषा शिकण्यासाठीचा दृष्टिकोन ठेवून तयार केलेले असतात. या पुस्तकांमध्ये अनुसरण करण्यास अशी सोपी भाषा, चित्रे आणि सामान्यीकृत शब्दसंग्रह असतो, जो तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतो.
तसेच, तुम्हाला YouTube वर लहान मुलांच्या अनेक कथा सहज मिळू शकतात, जसे की हा व्हिडीओ. या दोन पद्धती (वाचन आणि ऐकणे) एकत्र केल्याने तुम्ही भाषेत जास्तीजास्त आणि परिणामकारकपणे आत्मसात करू शकता.
ब. लेखन
तुम्हाला एखाद्या भाषेची लवकर सवय करून घ्यायची असेल तर लेखन हा आणखी एक आवश्यक भाग आहे. लेखन तुमच्या भाषेचे ज्ञान मजबूत करण्यास मदत करते. उदाहरणार्थ, जर तुम्ही अक्षर A हे फक्त डोळ्यांनी पाहत शिकत असाल, तर तुम्ही ते लिहिण्याच्या पद्धतीपेक्षा तुमच्यासाठी कदाचित कमी परिणामकारक असेल.
त्याशिवाय, तुमच्या इंग्रजी ज्ञानाचा व्यावहारिक वापर करण्यासाठी आम्ही तुम्हाला वाक्ये किंवा छोटे, सोपे इंग्रजी निबंध लिहिण्यासदेखील प्रोत्साहित करू इच्छितो. भाषेचा व्यावहारिक वापर ही भाषा प्रभावीपणे शिकण्याची गुरुकिल्ली आहे.
क. संभाषणे
आधी सांगितल्याप्रमाणे, व्यावहारिक माध्यमांद्वारे भाषा वापरणे हा ती भाषा चांगल्या प्रकारे शिकण्याचा एक उत्तम मार्ग आहे. आणि खऱ्या जीवनात तुम्ही शिकत असलेली भाषा वापरण्यापेक्षा अधिक परिणामकारक आणखी काय असू शकते? आणि हा भाग बहुधा अनेक शिकाऊ विध्यार्थ्यांसाठी सर्वात कठीण असू शकतो. मुख्यतः दुसर्या भाषेत बोलण्याची भीती किंवा लाज आणि स्वतःच्या भाषेच्या क्षमतेवरचा अविश्वास ही कारणे असू शकतात.
तथापि, एक चांगले वातावरण किंवा चांगला शिक्षक तुम्हाला नेहमी बोलण्यास प्रोत्साहित करेल, मग भले चुका झाल्या तरी बेहेत्तर. चुका केल्याने तुमची भाषा तर आणखी चांगली सुधारेल.
ड. जास्ती ताण घेऊ नका!
भाषा शिकणे ही एक प्रक्रिया आहे आणि त्यामुळे ती पूर्णपणे आणि पद्धतशीरपणे पाळली पाहिजे असे आमचे मत आहे. तथापि, मार्ग सोडून भटकणे आणि कधीकधी आपल्या स्वत: च्या मार्गाने इंग्रजी शिकणे देखील ठीक आहे, जोपर्यंत आपण ती भाषा योग्य रीतीने शिकत आहेत तोपर्यंतच. मुद्दामहून काही चुकीचे शिकायला जाऊ नका आणि जर तुमची खात्री नसेल तर दुसऱ्यांची मदत जरूर घ्या.
तसेच भाषा शिकणे ही एक प्रक्रिया असल्याने, तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागेल आणि त्यापैकी काहींवर त्वरित मात करणे तुमच्यासाठी खूप कठीण जाईल. तथापि, संयम ठेवा आणि मार्गक्रमण करत राहा. भाषा शिकताना तुम्हाला अशी कोणतीही अडचण येत नाही ज्याचा तुम्ही सामना
करू शकत नाही. फक्त काही अडचणींमध्ये वेळ लागू शकतो इतकेच. फक्त तुमचा निर्धार गमावू नका, ठीक आहे?
तळटीप आणि आमचे मत
एक शिकाऊ विध्यार्थी म्हणून, प्राथमिक इंग्रजी शिकणे अतिशय सोपे वाटू शकते पण जसजसे तुम्ही प्रगत स्तरावर जाता, तसे ते कठीण होऊदेखील शकते. तथापि, तसे जरी असले भाषा तरी शिकण्याचा अनुभव खूप मजेदार आहे. तुम्ही जर कोणती नोकरी वगैरे मिळवण्यासाठी किंवा परीक्षा देण्यासाठी एखादी भाषा शिकत असलात तरी त्याबद्दल जास्त काळजी करू नका.
भाषा शिकण्याचा आनंद घ्या! तुम्ही तसा दृष्टिकोन ठेवल्यास हा खरोखर एक आनंददायक अनुभव आहे. हे एक छंद म्हणून शिका आणि तुमची भाषा सुधृढ होताना पहा, अगदी तुमची जाणीव न होता. हा लेख संपवताना आमच्याकडे एवढाच सल्ला आहे.
Mon, 06-Feb-2023
Fri, 03-Feb-2023
Fri, 03-Feb-2023
Write a public review