Published - Mon, 06-Feb-2023
ऑक्सफर्ड स्वल्पविरामाने (Oxford Comma) संपूर्ण आधुनिक इंग्रजी इतिहासात एक जोरदार चर्चेचा विषय आहे, तरीही स्वल्पविराम योग्य आहे की नाही याविषयी अजूनही कुणाचेच एकमत नाही. या लेखात, हा स्वल्पविराम वापरणे योग्य आहे की नाही हे आम्ही सांगणार नाही (त्यासाठी खूप खोलात जावे लागेल). त्याऐवजी, आम्ही फक्त ऑक्सफर्ड स्वल्पविराम काय आहे ते पाहणार आहोत.
तर, ऑक्सफर्ड कॉमा म्हणजे नक्की काय?
ऑक्सफर्ड स्वल्पविराम, किंवा अनुक्रमांक स्वल्पविराम, हा स्वल्पविराम आहे जो "आणि" (And) किंवा "किंवा" (Or) या शब्दापूर्वी तीन किंवा अधिकच्या यादीतील दुसऱ्या आयटमनंतर वापरला जातो. हा स्वल्पविराम प्रथम ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने वापरला होता, म्हणून हे नाव.
ऑक्सफर्ड स्वल्पविराम वापरणे, ही ज्याची त्याची स्वतःची निवड असते. तसेच, ते प्रदेशावरही अवलंबून असते. उदाहरणार्थ, अमेरिकन इंग्रजी जवळजवळ नेहमीच ते वापरण्याची शिफारस करते. तथापि, कॅनडा किंवा यूके मधील इंग्रजी लेखन शैली या
विरुद्ध सल्ला देतात.
माझ्या वैयक्तिक मतानुसार, ऑक्सफर्ड स्वल्पविराम अशा वाक्यांमध्ये वापरला जावा ज्यामुळे त्या वाक्यातील संदिग्धता नाहीशी होईल.
काही मनोरंजक उदाहरणांसह ऑक्सफर्ड स्वल्पविराम कुठे वापरायचा आहे ते पाहू.
ऑक्सफर्ड स्वल्पविराम आणि संदिग्धता
संदिग्धता म्हणजे काय? संदिग्धता असे दर्शवते की एखाद्या शब्दाचा किंवा वाक्याचा एकापेक्षा जास्त अर्थ असू शकतो. ऑक्सफर्ड स्वल्पविराम तीन किंवा अधिकच्या मालिकेत सूचीबद्ध केलेल्या वस्तूंशी संबंधित संदिग्धतेशी संबंधित असल्याने, अशी दोन उदाहरणे घेऊ.
1. The office hires software engineers, artists, and salesmen.
येथे, "artists" आणि "and salesmen" मधील स्वल्पविराम हा ऑक्सफर्ड स्वल्पविराम आहे. तथापि, मी ते या वाक्यातून काढले तर अर्थ अजिबात बदलत नाही. हे बघा.
The office hires software engineers, artists and salesmen.
सॉफ्टवेअर अभियंता आणि कलाकार हे दोन पूर्णपणे भिन्न शब्द असल्याने त्यात संदिग्धता निर्माण होत नाही. तर, या प्रकरणात, ऑक्सफर्ड स्वल्पविराम पर्यायी किंवा अनावश्यक आहे, असे आपण खात्रीने म्हणू शकतो.
अजून एक उदाहरण घेऊ!
2. He gave his speech to the audience, cats, and dogs.
तुम्ही येथील ऑक्सफर्ड स्वल्पविराम ओळखू शकता का? छान! आता, मी तो स्वल्पविराम काढला तर? ते वाक्य असे असेल.
He gave his speech to the audience, cats and dogs.
ऑक्सफर्ड स्वल्पविराम काढून टाकल्याने येथे आपल्या वक्त्याने केवळ मांजरी आणि कुत्र्यांना भाषण दिल्याचे एक मजेदार उदाहरण तयार होते. तेथे स्वल्पविराम जोडल्याने प्रेक्षक एक स्वतःचा घटक म्हणून विभक्त होईल. ज्यामुळे असे स्पष्ट होते कि प्रेक्षकामध्ये काही फक्त मांजरी आणि कुत्रेच नाही तर इतर लोकही आहेत.
अर्थात, हे वाक्य तरीही स्वतः तितके स्पष्ट नाही कारण येथे आपणास "प्रेक्षक" नक्की कोण आहेत याचा सुगावा लागत नाही. पण, किमान ते फक्त मांजरी आणि कुत्रे नाही. बघा अर्थ कसा बदलतो?
चला आणखी काही उदाहरणे पाहू या जेथे मालिकेतील तीन किंवा अधिक घटक स्पष्टपणे विभक्त करण्यासाठी स्वल्पविराम निश्चितपणे आवश्यक असेल.
a. Ms Sarita is working on two projects, designing the brochure, and preparing a speech.
b. He went there with his parents, Rahul, and Anuja.
अंतिम विचार
ऑक्सफर्ड स्वल्पविराम वापरावरील सार्वभौम मान्यता ही अजून तरी दिली गेलेली नाहीये. तथापि, वस्तुनिष्ठपणे बोलायचे झाल्यास, स्वल्पविराम योग्य वाटेल तसे व्यक्तिनिष्ठपणे वापरणे आपल्यावर अवलंबून आहे. तुम्ही वर पाहिल्याप्रमाणे, या स्वल्पविरामाची गरज आहेचं असे नाही, खरे आहे ना?
तर, ऑक्सफर्ड स्वल्पविरामाबद्दल आपण काय शिकलो? हा स्वल्पविराम एखाद्या वाक्यात तुम्हाला योग्य वाटेल तेथे तो योग्यप्रकारे वापरा. एखाद्या जागी ऑक्सफर्ड स्वल्पविराम ना वापरल्याने वाक्यात गोंधळ होईल असे तुम्हाला वैयक्तिकरित्या वाटत असल्यास, तेथे तो स्वल्पविराम नक्कीच वापरा. तथापि, आपण कोणत्या भाषेचे नियम किंवा लेखन शैली पाळत आहात याची जाणीव ठेवा. कारण आधी सांगितल्याप्रमाणे, काही लेखन शैली मार्गदर्शक ऑक्सफोर्ड स्वल्पविराम वापरण्यास सक्त मनाई करतात.
तथापि, लेखन ही एक वैयक्तिक क्रिया आहे आणि लेखन शैलीचे स्वतःचे व्यक्तिमत्व आहे. तर, तुम्ही स्वल्पविराम वापरावा की नाही? मी ते तुमच्या सर्वोत्तम निर्णयावर सोडेन.
तुमची कौशल्ये वाढवण्यासाठी तुम्ही काही उपयुक्त अभ्यासक्रम शोधत असाल, तर मोकळ्या मनाने आमची वेबसाइट ब्राउझ करा किंवा अधिक माहितीसाठी आम्हाला संदेश द्या!
Mon, 06-Feb-2023
Fri, 03-Feb-2023
Fri, 03-Feb-2023
Write a public review