Published - Fri, 03-Feb-2023
भारतामध्ये लहान व्यवसायांची एखादी ऑनलाइन ओळख असणे ही तशी अजूनही एक नवीन संकल्पना आहे. अनेकजण या पर्यायाचा विचार करत नसले तरी, त्यांच्यापैकी काहींना ते त्यांच्या व्यवसायासाठी किती महत्त्वाचे आहे हे जाणवू लागले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे भारतात एक स्वतःची वेबसाइट असणे. परंतु अशी वेबसाइट असण्यासाठी, तुम्हाला एका होस्टची गरज असते. तर, तुम्हाला भारतात वर्डप्रेस होस्टिंग सोल्यूशन्स कसे आणि कुठे मिळतील? चला, आपण शोधून काढू या!
वर्डप्रेस म्हणजे काय?
सर्वप्रथम आपण वर्डप्रेस काय आहे ते जाणून घेऊयात. सामान्य माणसाच्या दृष्टीने, वर्डप्रेस हे मुळात तुमची वेबसाइट बनवण्याचे एक साधन आहे, जे मोफत उपलब्ध आहे! आधीच्या काळात तुम्हाला तुमची वेबसाइट बनवण्यासाठी डेव्हलपरची गरज असायची. आता वर्डप्रेस अंशतः तो पर्याय काढून टाकते.
तुमची कोणतीही तांत्रिक पार्श्वभूमी नसली तरीही तुम्ही वर्डप्रेससह एक मूलभूत वेबसाइट काही तासांत तयार करू शकता. हे एक EMS साधन आहे जे तुम्हाला सर्व आवश्यक साधने आणि हजारो विनामूल्य टेम्पलेट्स वेबसाइट तयार करण्यासाठी देते. अप्रतिम आहे, नाही? वर्डप्रेस वेबसाइट तयार करणे खरोखरच सोपे करते.
तथापि, तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी एक अनोखी दिसणारी वेबसाइट तयार करायची असल्यास तुम्हाला अजूनही डेव्हलपरची नियुक्ती करावी लागेल.
वर्डप्रेस होस्ट म्हणजे काय?
जरी तुम्ही वर्डप्रेससह विनामूल्य वेबसाइट तयार करू शकत असला तरीही होस्टिंग हे पूर्णपणे भिन्न डोमेन आहे. 'होस्ट' हा मुळात एक सर्व्हर असतो जो तुमची वेबसाइट इंटरनेटवर लाइव्ह ठेवतो आणि ती लोकांसाठी उपलब्ध करून देतो. तुमच्या वेबसाइटसाठी एक विशिष्ट वेबसाइट पत्ता (डोमेन नाव) मिळविण्यासाठी, तुम्हाला एका होस्ट सर्विसची आवश्यकता असते.
तांत्रिकदृष्ट्या, तुम्हाला होस्टची गरज आहे का? नाही. तुम्ही वर्डप्रेसवर फक्त वेबसाइट तयार करू शकता आणि ती ".wordpress.com" डोमेनसह प्रकाशित करू शकता. तथापि, यामुळे तुमच्या व्यवसायाला ती अद्वितीय ओळख मिळत नाही. शिवाय, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी किंवा तुमच्या वेबसाइटवर हेवी-ड्युटी रहदारी हाताळण्यासाठी ते इष्टतम नाही.
तर, जरी होस्टिंगसाठी खर्च येत असला तरी त्याच्या काही अतिशय फायदेशीर बाजूदेखील आहेत. सर्वप्रथम, तुम्ही एक विशिष्ट डोमेन नाव निवडू शकता जे तुमच्या व्यवसायासाठी एक अद्वितीय ओळख निर्माण करेल. दुसरे म्हणजे, होस्टिंगसाठी खर्च जरी येत असेल तरी तो परवडणारच नाही असे नाही. तुमचा विश्वास बसणार नाही कदाचित, पण तुम्ही तुमच्या मासिक मोबाइल डेटा पॅकसाठी जेवढे पैसे देता त्यापेक्षाही कमी पैशात तुमच्या वेबसाइटसाठी दर्जेदार होस्ट मिळवू शकता; ज्यामुळे तुमची वेबसाइट हेवी-ड्यूटी ट्रॅफिक भार हाताळू शकते आणि आपली वेबसाइट नेहमीच चालू राहील याची खात्री करते.
तसेच, तुमच्या होस्टिंग पॅकेजच्या अनुसार, तुम्हाला तुमच्या होस्ट प्रदात्याकडून वेबसाइट मेंटेनन्स सेवा देखील मिळू शकते.
भारतात होस्टिंग सेवेची किंमत कशावरून ठरवली जाते?
जेव्हा किंमतींचा विचार केला जातो तेव्हा बरेच निर्धारक असतात. जरी तुम्हाला ५०-१५० रुपये किमतीचे होस्टिंग पर्याय सापडले तरी ते तुमच्यासाठी योग्य असतीलच असे नाही.
वर्डप्रेस होस्टिंगचे दोन प्रकार आहेत. तुमची वेबसाइट होस्ट करण्यासाठी शेअर्ड होस्टिंग सर्व्हर हा पहिला पर्याय. याचा अर्थ तुमची वेबसाइट एका अशा सर्व्हरवर होस्ट केली जाईल ज्यावर इतर वेबसाइट देखील होस्ट केल्या गेलेल्या आहेत. उदाहरणार्थ, असा विचार करा की इतर तुम्ही एक अपार्टमेंट भाड्याने घेतलेले आहे पण त्यात इतर भाडेकरू देखील राहतात. दुसरा पर्याय हा डेडिकेटेड होस्टिंग आहे, जिथे तुम्हाला सर्व्हर आणि त्याची संसाधने फक्त तुमच्या वेबसाइटसाठी राखीव ठेवली जातात. अर्थात, सामायिक होस्टिंगपेक्षा हा तुलनेने अधिक महागडा पर्याय आहे.
दुसरे म्हणजे, ऑपरेटिंग सिस्टम. होस्ट त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टम म्हणून विंडोज किंवा लिनक्स वापरतात. विंडोजहे सशुल्क सॉफ्टवेअर असल्याने, विंडोज OS सर्व्हरवर होस्टिंग करणे थोडे अधिक महाग होते. तथापि, या क्षेत्रातील अनेक तज्ञ असे सांगतात की लिनक्स वापरणे आपल्या वेबसाइटसाठी विंडोज पेक्षा अधिक व्यवहार्य असू शकते कारण ती मुक्त-स्रोत, विनामूल्य आणि लवचिक आहे.
आणि तिसरे, हार्डवेअर. स्वस्त होस्टिंग पर्यायांमुळे तुम्हाला तुमच्या वेबसाइटसाठी कमी स्टोरेज स्पेस मिळू शकते आणि वेबसाइटचा परफॉर्मन्स देखील थोडा कमी आढळून येऊ शकतो—जर तुम्हाला तुमची वेबसाइट जागतिक स्तरावर प्रकाशित करायची असल्यास हा पर्याय नक्कीच योग्य असू शकत नाही. अधिक महाग पॅकेजेस तुमच्या वेबसाइटसाठी अधिक स्टोरेज स्पेस आणि हार्डवेअर संसाधने देतात.
म्हणून, आपण होस्टिंग पॅकेजचा विचार करण्यापूर्वी हे घटक लक्षात ठेवणे महत्वाचे आहे.
भारतातील सर्वोत्तम वर्डप्रेस होस्टिंग सोल्यूशन्स कोणते आहेत?
भारतातील वर्डप्रेस होस्टिंग सोल्यूशन्सची किंमत दरमहा ₹59 इतकी कमी असू शकते. परंतु, आपल्या वेबसाइटसाठी दर्जेदार होस्ट मिळणे देखील आवश्यक आहे, नाही का?
1. होस्टिंगर
Hostinger हे लिथुआनियन-आधारित वर्डप्रेस होस्टिंग सोल्युशन आहे जे भारतात लोकप्रिय आहे. त्यांच्याकडे भारतातील सर्व प्रकारच्या वेबसाइट होस्टिंग सोल्यूशन्ससाठी पासून सर्वोत्कृष्ट पॅकेजेस आहेत जे दरमहा ₹69 पासून सुरु होतात. Hostinger सह तुम्हाला किमान 50GB SSD स्टोरेज स्पेस, 1 वर्षासाठी मोफत डोमेन नाव, 100GB बँडविड्थ, 2 डेटाबेस आणि 1 ईमेल खाते—सर्व काही एका वेबसाइटसाठी मिळते.
अधिक तपशीलांसाठी, कृपया वरील लिंकवर क्लिक करा.
2. बिगरॉक
BigRock ही एक भारतीय होस्टिंग कंपनी आहे जी भारतीय वेबसाइट्सना जागतिक दर्जाची होस्टिंग सोल्यूशन्स प्रदान करते. ₹५९/महिना इतक्या स्वस्त प्लॅनसह, BigRock स्वस्त होस्टिंग सोल्यूशन ऑफर करते. यामध्ये डेडिकेटेड आणि शेअर्ड होस्टिंग पर्याय उपलब्ध आहेत जे Windows किंवा Linux OS आणि उत्कृष्ट हार्डवेअर संसाधनांद्वारे समर्थित आहेत ज्यामुळे तुमची वेबसाइट सुरळीत चालू राहते.
त्यांच्या होस्टिंग योजनांबद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी त्यांची वेबसाइट पहा.
3. ब्लूहोस्ट
BlueHost हा जगभरातील आणखी एक प्रसिद्ध होस्टिंग सोल्यूशन्स ब्रँड आहे जो भारतातही प्रसिद्ध आहे. त्यांचे डेटा सेंटर्स भारतातच असल्यामुळे, BlueHost हा एक भारतीय वेबसाइट्ससाठी सर्वोत्तम होस्टिंग सोल्युशन पर्याय आहे. ₹169/महिना पासून सुरू होणार्या त्यांच्या शेअर्ड होस्टिंग पर्यायांसह, BlueHost त्यांच्या वेबसाइटसाठी उच्च-गुणवत्तेची हार्डवेअर संसाधने आणि तांत्रिक समर्थन प्रदान करते, अगदी स्वस्त योजनेमध्येदेखील!
अधिक तपशीलांसाठी, कृपया त्यांच्या वेबसाइटला भेट द्या.
निष्कर्ष
भारतात वर्डप्रेस होस्ट्सची प्रचंड संख्या आहे. या लेखात, आम्ही भारतातील वर्डप्रेस होस्टिंग सोल्यूशन्ससाठी शीर्ष तीन पर्याय निवडले आहेत. हे आमचे वैयक्तिक मत आहे आणि ही माहिती वर नमूद केलेल्या कोणत्याही कंपन्यांच्या संलग्नतेने किंवा प्रयोजकतेद्वारे प्रभावित झालेली नाही. आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटेल.
या लेखावर तुमच्याकडे इतर काही सूचना असल्यास, आमच्याशी मोकळ्या मनाने कनेक्ट व्हा.
Mon, 06-Feb-2023
Fri, 03-Feb-2023
Fri, 03-Feb-2023
Write a public review